वाय. सी. एम. मुक्त विद्यापीठ व बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड यांचा झाला सामंजस्य करार.. शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार..
नाशिक - प्रतिनिधी ] यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे. करारानुसार दोन्ही संस्था संयुक्तरित्या नवी मुंबई येथील जेएनपीए परिसरात ड्रायव्हिंग आणि लॉजिस्टिकचे देशातील सर्वात अत्याधुनिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार आहेत. विद्यापीठात उभय पक्षातर्फे करारावर स्वाक्षरी केली.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, बीव्हीजी इंडिया लिमिटेडच्या लर्निंग अँड डेव्हलपमेंटचे सहायक उपाध्यक्ष सुरज महाजन, विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड,व्यवसाय शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम,बीव्हीजीचे उत्तर महाराष्ट्र विभागप्रमुख बाळासाहेब कांकळे,वरिष्ठ व्यवस्थापक प्रशिक्षण सुदर्शन भालेराव उपस्थित होते.
या करारानुसार अत्याधुनिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकासकेंद्र निर्मितीचा उपक्रम ड्रायव्हिंग व लॉजिस्टिक क्षेत्रात जागतिक दर्जाची कौशल्ये, आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण आणि मोफत प्रशिक्षणाची त्रिसूत्री पूर्ण करेल. जेएनपीए मधील बिझनेस फॅसिलिटेशन सेंटरमध्ये या प्रकल्पाचा पहिला प्रशिक्षण वर्ग राबवला जाईल.त्यानंतर जेएनपीएच्या नवीन परिसरात पूर्णवेळ प्रशिक्षण सुविधा विकसित केल्या जातील.त्यात जागतिक स्तराच्या सुविधा उपलब्ध असतील.प्रामुख्याने थिअरी साठी अद्ययावत वर्ग खोल्या,सिम्युलेटर लॅब, ऑटो इंजिनिअरिंगसाठी प्रयोगशाळा,ड्रायव्हिंग रेंज, कंट्रोल रूम आणि मेस व निवासाची व्यवस्था असेल.
प्रशिक्षणार्थीना आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त प्रक्रियांचे ज्ञान दिले जाईल.आरटीओ आणि इतर संस्थांशी समन्वय साधून परवाना नूतनीकरण आणि प्रगत प्रमाणपत्राची सुविधा मिळेल.
जड व हलक्या वाहन चालकांसाठी प्रशिक्षणार्थीना आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त प्रक्रियांचे ज्ञान मिळणार.आरटीओ आणि इतर संस्थांशी समन्वय साधून परवाना नूतनीकरणआणि प्रगत सर्टिफिकेशनची सुविधा मिळेल.जड व हलक्या वाहन चालकांसाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्रशिक्षण चालक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवाढीचा अभ्यासक्रम.रस्ता सुरक्षा आणि व्यवस्थापन प्रशिक्षण,पोर्ट लॉजिस्टिक, वेअरहाउसिंगची माहिती.
मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टचे प्रशिक्षण दिले जाणार.
आंतरराष्ट्रीय नोकरीसाठी सक्षम व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न.मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचे कराराचे प्रमुख उद्दिष्ट्ये
----------------
कोट -
हा प्रकल्प भारतातील ड्रायव्हिंग आणि लॉजिस्टिक 66 प्रशिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरेल.शिक्षण-प्रशिक्षण आणि रोजगार याचे जिवंत उदाहरण या कराराद्वारे आपणास बघावयास मिळेल.
डॉ.संजीव सोनवणे,
कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
--------------
कोट -
बीव्हीजीच्या लर्निंग अॅण्ड डेव्हलपमेंट चमूसाठी अभिमानाचा क्षण आहे. आम्ही प्रशिक्षणासोबत भविष्यातील जागतिक ड्रायव्हिंग नेतृत्व घडवत आहोत.
सुरज महाजन,
सहायक उपाध्यक्ष,बीव्हीजी इंडिया लिमिटेड.
------------------
Post a Comment