ad headr

Powered by Blogger.

तहसीलदार साहेब ,,गौण खनिज उत्खनन चालतंय ,,विना पर मीट.. उघडा डोळे बघा नीट... .




अमळनेर शहरांमध्ये गौण खनिज उत्खननाचे रॅकेट जोरात सुरू आहे. एक जेसीबी दिवसभर मुरूम खोदण्याचे काम करते आणि एक जेसीबी दिवसभर ट्रक मुरुमाने लोड करण्याचे काम करते. असे शनिवार रविवार दिवसभरात आणखी एक टेकडी उध्वस्त करते. शहरात बऱ्याच मोठ्या मोठ्या साईट चालू आहेत. त्या ठिकाणी शेकडो ब्रास मुरूम अव्यहत पणे सुरू आहे. 24 तासाचे लाखो रुपयाचे वाटप होते. सर्व यंत्रणाना मलई वाटली जाते. अत्यंत पद्धतशीरपणे मुरुम पुरवठा जोमात सुरू असतो. वाळू, मुरूम माझ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा रास होतो आहे.
मात्र जबाबदार अधिकारी शांत बसले आहेत.या चुपीचे नेमके कारण काय हेच नागरिकांना पडलेले कोडे आहे. चांगल्या चांगल्या रतीमहारतींचे विकेट रेती आणि मुरमने घेतले आहे.



No comments