ad headr

Powered by Blogger.

महसूल विभागाच्या योजना व लाभांसाठी गिरड येथे समाधान शिबिर संपन्न

    


       भडगाव प्रतिनिधी. सुभाष ठाकरे.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात. सर्वसामान्य जनता शेतकरी, विदयार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबीराचे आयोजन करणेसंदर्भात मा. उपसचिव महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक/2025/प्र.क्र. 34/ई-8 दिनांक 25 मार्च 2025 नुसार आदेशित केलेले आहे. त्या अनुषंगाने गिरड मंडळ भागात मौजे गिरड तालुका भडगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्र बैठक हॉल, गिरड येथे दिनांक 12/06/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर मा. श्रीमती शितल सोलाट मॅडम, तहसिलदार भडगाव यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत 
करण्यात आले. 




सदर शिबीरात तालुक्यातील तहसिल कार्यालयातील पुरवठा विभाग, सं.गा.यो. इं.गा. यो, श्रावणबाळ योजना, पंचायत समिती भडगाव, महाराष्ट्र विज वितरण कंपनी भडगाव, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग भडगाव, तालुका कृषी विभाग भडगाव, ग्रामीण रुग्णालय भडगाव, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय भडगाव, उपअधिक्षक भूमी अभिलेख भडगाव, सहायक निबंधक सहकारी संस्था भडगाव, पशुवैदयकिय अधिकारी भडगाव, दुय्यम निबंधक नोंदणी व मुद्रांक विभाग भडगाव, शिक्षण विभाग भडगाव इत्यादी विविध शासकिय कार्यालयामार्फत तसेच बचतगटामार्फत स्टॉल लावण्यात आले होते. शिबीरात सर्व संबधित विभागातील योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. शिबीराचे अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड यांचेमार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात येवून लाभार्थ्यांना स्तनदा माता योजनं अंतर्गत वेवी केयर किट, 7/12 उतारे, जातीचे दाखले, गुणवंत विदयार्थी, ईकेवायसी (नैसर्गिक आपत्ती अनुदान), अंत्योदय योजना लाभार्थी, संगायो श्रावणबाळ योजना लाभार्थी, उत्पन्न दाखले, डोमीसाईल अॅग्रीस्टैंक, नॉन क्रिमीलेयर दाखले व इतर लाभाचे वितरण करण्यात आले. सदरच्या शिबीरास भंडगाव तालुक्यातील व मंडळ भागातील नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच माहिती जाणून घेवून शिबीराचे यशस्वीतेसाठी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला.

No comments