ad headr

Powered by Blogger.

पोलीस प्रशासनाची होते आहे थट्टा... अमळनेर मध्ये जोमात सुरू आहे सट्टा..





अमळनेर प्रतिनिधी. परीविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या बदलीनंतर अमळनेर शहरात सट्टा मटक्याची पिक आलेले आहे. जवळ जवळ 80 ते 82 सट्टा मटक्याचा पिढ्या अमळनेर शहरात बिनदिक्कत चालू आहेत. पेरणीचे दिवस असून अमळनेर तालुका हा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. पेरणीच्या दिवसात बी बियाणे, खते, लागवडीसाठी लागणारे शेती पूरक वस्तू, फवारे ,कीटकनाशके हे सगळे घेण्याची तारांबळ उळलेली असते. बऱ्याच शेतकऱ्यांकडे हक्काचा पैसा पेरणीसाठी नसतो. इथून तिथून उसणवार किंवा कर्ज रुपी पैसा घेऊन शेतकरी बाजार करण्यासाठी आलेला असतो. परंतु काही शेतकऱ्यांना किंवा शेतकरी पुत्रांना लालसे पोटी सटटयाची ओढ लागून जाते व ते आपल्या जवळचा पैसा सट्टा मटक्यावर लावून देतात, अशा पद्धतीने जुगारात पैसे हरून जातात, परिणामी त्यांचे वेळेवर पेरणी होत नाही. सर्व वर्षाचा आर्थिक डोलारा विस्कळीत होतो. या सगळ्यांना कारणीभूत मटक्याच्या पिढ्या असून त्या त्वरित बंद होणे अनिवार्य आहे असे जाणकारांचे मत आहे. पोलीस प्रशासनाने त्वरित अश्या बेकायदेशीर व अवैधरित्या चालणाऱ्या सट्टाच्या पिढ्यांवर त्वरित बंदी आणावी व शेतकऱ्यांना व अंमळनेरकरांना त्यापासून मुक्त करावे. ही मागणी जोर धरू लागली आहे. या सर्व अवैध धंदा चालण्याच्या पाठीमागे काही राजकीय वरदहस्त किंवा पोलीस प्रशासनाचे सहकार्य असावे असे नागरिकांचे मत आहे.

No comments