ad headr

Powered by Blogger.

जि.प.शाळा नगरदेवळा सूतगिरणी येथे प्रवेश उत्सव व पाठ्यपुस्तक वाटप..




     भडगाव  { प्रतिनिधी }.. सुभाष ठाकरे
भडगाव तालुक्यातील जि.प. प्राथ. शाळा नगरदेवळा सूतगिरणी येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी गावातून प्रभात फेरी करण्यात आली व मुला-मुलींना शाळेत नियमित पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बुके देऊन स्वागत करण्यात आले .तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. पालक सभेत मुख्याध्यापक प्रवीण पाटील यांनी शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली .



सदर प्रसंगी ग्रा.पं. सदस्या कल्पना वाघ, सामाजिक कार्यकर्ते कैलास वाघ, दत्तात्रय ठाकरे ,रवींद्र सुतारे, निळकंठ पाथरवट, समाधान पाथरवट, नवनाथ सोनवणे अंगणवाडी सेविका कमलबाई पाटील, माया संसारे, संध्या महाले,किरण
कुंभार .माता-पालक, नागरिक उपस्थित होते. मध्यान्ह भोजनात जिलेबी वाटप करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी तर आभार किरण सर यांनी मानले.

No comments