ad headr

Powered by Blogger.

रावेर तालुक्यातील अवैध वाळू तस्करांची हुजरेगिरी करतेय कोण ?

जळगाव प्रतिनिधी
दि.२०/०५/२४




रावेर तालुक्यातील अजनाड, आटवाडा, दोधे, खिरवड, पातोंडी, तामसवाडी, केऱ्हाळा, भोकरी इत्यादी ठिकानांच्या तापी नदी पात्रासाह इतर नदीपात्रातून बेकायदेशीर पद्धतीने वाळू उपसा करून अवैधरित्या रात्री ११:०० ते पहाटे ०५:०० रावेर येथिल सुमारे १०० ट्रॅक्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुख्य चौकातून तर पहाटे ०६:००ते दिवसभर रावेर - बऱ्हाणपूर रोडवरील खालच्या पेट्रोल पंपा लगतच्या नाल्यातील कच्च्या रस्त्याने आठवडे बाजार परिसरातून सर्वत्र रावेर शहर व शहरालगत असलेल्या गावांमध्ये २८ ट्रॅक्टर चे माध्यमातून स्वतंत्र पोलिस ठाणे व तहसीलदार कार्यालय असलेल्या रावेर शहरातून निडरपणे वाळू वाहतूक सुरु आहे. नेमक या अवैध परंतु निडरपणाने नियमबाह्य संबंधित जबाबदार विभागांच्या नाकावरच नव्हे छातडावर पाय ठेवून दररोज हजारो ब्रास वाळूचा उपसा करून विना क्रमांकाच्या वाहनांतून वाळू वाहतूक व्यवसाय करणाऱ्या या वाळू तस्करांची नेमकी हुजरेगिरी कोण व का? करत आहे? या अवैध व्यवसायाला व हुजरेगिरीला आळा  बसेल का? या विषयी सुज्ञ जनतेत गेल्या अनेक महिन्यांपासून मावळती चर्चा आहे..
        
   वरील अवैध व्यवसायास स्थानिक जबाबदार विभागांचा आर्थिक लालसापोटी सदर व्यवसायास कसा मदतीचा भक्कम हात व साथ आहे. याचे भक्कम पुरावे वरिष्ठ कार्यालयांना देवूनही जैसे थे परिस्थिती असल्याने वरिष्ठांचा ही फुल नाही फुलांची पाकळी असा आशीर्वाद असावा असे वाटत आहे.



मानवहित वृत्त समूहासाठी मुख्यसंपादक प्रकाश बोरसे सह कार्यकारी संपादक शेखर सोनवणे जळगांव

No comments