ad headr

Powered by Blogger.

कार्यकर्ता बनला गिरीश महाजन यांचा हनुमान

जळगाव प्रतिनिधी
दि.१७/०५/२४





जळगाव - रामायणामध्ये प्रभू श्रीराम हनुमान यांच्या निष्ठेवर प्रभावित होऊन ते हनुमानाला म्हणतात की, तुझ्या निष्ठेचे फळ मी तुला काय देऊ. तेव्हा हनुमान म्हणतात की प्रभू माझ्या वक्षस्थळाच्या खाली माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची जिवंत प्रतिमा मला हवी आहे, प्रभु राम तथास्तु म्हणतात. जेव्हा हनुमान आपली छाती चिरून दाखवतात तर प्रभू श्रीरामांची जिवंत प्रतिमा हनुमानाच्या छातीमध्ये दिसते. त्याचाच प्रत्यय जळगाव जिल्ह्यामध्ये आला आहे. ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पहिलवान कार्यकर्ता शिवाजी रामदास पाटील यांनी आपल्या छातीवर गिरीश महाजन यांची प्रतिमा गोंधून त्याखाली 'आमचे दैवत' असे लिहिले आहे. 




त्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये हा चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाजी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली असता ते म्हणाले की, गिरीश भाऊ माझे दैवत आहेत, आई-वडिलांनंतर मी त्यांनाच मानतो, मी त्यांच्यासाठी माझे प्राण देखील द्यायला तयार आहे. गिरीश भाऊ गोरगरीब जनतेसाठी आरोग्याच्या सुविधा असो की दुसऱ्या कोणत्याही अडचणी असो ते तात्काळ सोडवतात. मला त्यांच्याकडून कोणताही वैयक्तिक स्वार्थ साधायचा नाही. मी देवाला एवढीच प्रार्थना करेल की भाऊंना दीर्घायुष्य लाभू दे. आताच्या या स्वार्थी राजकारणामध्ये शिवाजी पाटलांसारखे निस्वार्थी, निस्सिम कार्यकर्ते मिळणे दुर्मिळच आहे.

No comments