अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसान भरपाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग प्रदेशाध्यक्ष सौ. रिता ताई बाविस्कर ह्याचे तहसीलदार ह्यांना निवेदन
दि .27/02/24
अमळनेर - पातोंडा आणि परिसरात दि.२६/०२/२०२४ रोजी रात्री 10 वाजता झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्या संदर्भात सदर पंचनाम्याचे निवेदन तहसीलदार यांना देताना परिसरातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. त्याप्रसंगी पंचनामे करुन तात्कालिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याबाबत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्ष तसेच महाराष्ट्र शासन ग्रंथालय राज्य नियोजन समिति सदस्य सौ. रिता ताई बाविस्कर, यांनी नायब तहसीलदार साहेबांना विनंती केली व लेखी स्वरूपात निवेदन देखील सादर केले.
याप्रसंगी एल.टी.पाटील ,शेतकरी नेते सुभाष पाटील,शिवाजी दौलत पाटील,सुरेश पिरन पाटील,धनगर दला पाटील,मनोज दाजीबा पाटील, विकास सोसायटी पातोंडा चेअरमन सुनिल पवार,जितेंद्र पवार,राहुल पवार,राहुल लंबोळे,हर्षल पवार ,संजय पवार, दिपक पवार, भोजराज पाटील,आंना गंगाराम पाटील, आर. डी.पवार सर,जयवंतराव पवार भरत बिरारी विजय पवार,भूषण पवार,पांडुरंग बोरसे इत्यादी शेतकरी हजर होते.


Post a Comment