भडगाव येथील ग्रामीण कारागारांची विविध कार्यकारी ग्रामउद्योग सहकारी संस्थेचे चेअरमन सुनील मिस्तरी व व्हाईस चेअरमन सुधाकर जाधव यांची बिनविरोध निवड
भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे
दि.16/02/24
भडगाव- तालुक्यातील ग्रामीण कारागारांची विविध कार्यकारी ग्रामउद्योग संस्थेचे चेअरमन पदी सुनील मिस्तरी आणि व्हाईस चेअरमन पदी सुधाकर जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुनील मिस्तरी यांना सलग दुसऱ्यांदा चेअरमन पदासाठी संधी मिळाली आहे. चेअरमन पदासाठी सुनील मिस्तरी यांचा एकमेव अर्ज आला होता, तर व्हॉइस चेअरमन पदासाठी सुधाकर जाधव यांनी अर्ज केला होता. निवडी वेळी सुनील मिस्तरी व सुधाकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भडगाव सहाय्यक निबंधक महेश कासार, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश पाटील, व भाऊसाहेब महाले कार्यालयीन प्रमुख प्रेमसिंग पाटील यांनी काम पाहिले. तसेच नवनिर्वाचित संचालक यशवंत सिताराम सुतार, सुरेश कैलास बोरसे, एकनाथ सुखदेव लोहार, नाना रमेश मिस्तरी, शाम संतोष बागुल, किरण गुलाब देवरे, उज्वला भैयासाहेब हिरे, ज्योती बाळासाहेब मोरे.धनराज शार्दुल, बापूराव शार्दुल,अमोल जगताप,विजय देवरे,संजय शार्दुल, संजय हिरे,शिवाजी शार्दुल, माजी सचिव एस. पी.विसपुते. उपस्थित होते.

Post a Comment