ad headr

Powered by Blogger.

जी. प. केंद्रशाळा पिंप्री खुर्द येथे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

धरणगांव प्रतिनिधी- नरेंद्र बडगुजर
दि.24/02/24
 

धरणगांव-गुरुवार दि.23/02/24 रोजी जि. प. केंद्र शाळा पिंप्री खुर्द ता. धरणगाव येथे इ.1 ते 4 च्या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोरंजक व समाज प्रबोधन पर कार्यक्रम सादर केले
            कार्यक्रमास जि. प. सदस्य मा.गोपाल बापूसाहेब चौधरी, सरपंच कमलाबाई धोबी, उपसरपंच मंगल अण्णा पाटील, माजी सरपंच सरलाबाई बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजेंद्र साळुंखे व सदस्य व केंद्रप्रमुख प्रमोद पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्रीमती अलका पालवे व सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.

No comments