जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आढावा बैठक संपन्न
अमळनेर प्रतिनिधी - प्रकाश बोरसे
०९/०१/२४
जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आढावा बैठक आज मुंबईत पार पाडली. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे साहेब, माजी आरोग्य मंत्री मा.श्री. राजेश भैय्यासाहेब टोपे, तसेच मा. श्री. जितेंद्र आव्हाड साहेब, खजिनदार मा.श्री. हेमंतजी टकले साहेब, महिला प्रदेशाध्यक्ष सौ.रोहिणीताई खेवलकर, युवक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. मेहुबब शेख, प्रदेश सरचिटणीस मा. श्री. रविंद्र पवार साहेब, यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. पक्षाचे संघटन बळकट करणे याविषयी पवार साहेबांनी काही मौलिक सूचना केल्या.
त्याप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री.उमेश पाटील साहेब, जळगाव जिल्हाध्यक्ष मा.श्री. रविंद्र भैय्यासाहेब पाटील, माजी पालक मंत्री तसेच आम. मा.श्री. गुलाबराव आप्पासाहेब देवकर, शिक्षक पदवीधर माजी आमदार मा.श्री. दिलीप तात्यासाहेब पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक मा.श्री.अतुल पाटील, शहराध्यक्ष श्री.अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस सौ.तिलोत्तमाताई पाटील, महाराष्ट्र शासन ग्रंथालय राज्य नियोजन समिती सदस्य तथा प्रदेश समन्वयक ग्रंंथालय विभाग सौ.रीताताई बाविस्कर व जिल्ह्यातील इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment