काय ते दिवस! काय त्या आठवणी!...बसुया परत एकदा कॉलेज च्या त्या कट्ट्यावर
यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ एरंडोल अध्यापक विद्यालयाचे तब्बल 17 वर्षानंतर सन 2006 च्या डी. एड. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. यावेळी कॉलेज जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला. काहींनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली..आपले वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक वर्षांनंतर आपण एकत्र भेटत आहोत. त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातील भावनाही होतीच; पण एकत्र आले आणि सर्वांनीच गळाभेट घेतली.
या कार्यक्रमासाठी सस्थेचे अध्यक्ष अमित दादा यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून दिपक पाटील सर , रमेश खैरे , नेहा लोहार ,भोसले सर ,दिनानाथ पाटील सर यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment