महिंदळे येथील बंद घरातून 5 क्विंटल कापसाची चोरी
भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे
०९/०१/२४
भडगाव - महिंदळे येथील दि. 5 रोजी पंचशील नगर येथील बंद घरातून अज्ञात चोरांनी 5 ते 6 क्विंटल कापसाची चोरी केली असून श्री.धर्मा लोटन खैरनार यांनी दि.6 रोजी भडगाव पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली मात्र अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी वा पोलीस पंचनामे झाले नाही त्यामुळे पोलिसांच्या चौकशी विषयी शंका उपस्थित केली जात आहे.
तरी सामान्य शेतकऱ्यांना शासनाकडून अगोदरच कापसाला कमी भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांवर संकटाची मालिका उद्भवली आहे त्यात भर म्हणजे शासकीय यंत्रणांच्या दिरंगाईमुळे अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. तरी कापूस चोरी बद्दल पोलीस प्रशासनाने सामान्य शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
Post a Comment