डी. डी. एस. पी. कॉलेज,एरंडोल येथे राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
एरंडोल प्रतिनिधी - नितिन भोसले
दि.२५/०१/२४
एरंडोल - मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव व डी. डी. एस. पी. कॉलेज एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय मतदार दिवस' आज दि.25 जानेवारी रोजी डी. डी. एस. पी. कॉलेज येथे साजरा करण्यात आला.जिल्हाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त करतांना मतदान जागृतीचे महत्त्व सांगितले.
एरंडोल येथे राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी मा. श्री. आयुष प्रसाद, प्रांताधिकारी श्री. मनिष गायकवाड, एरंडोल तहसीलदार मा. चव्हाण मॅडम, पारोळा तहसीलदार श्री. देवरे साहेब, डी. डी. एस. पी. कॉलेज चेअरमन श्री. अमित राजेंद्र पाटील, तसेच निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन साहेब, कुंवर साहेब तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी समाजातील सर्व घटकांना आमंत्रित करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग, तृतीयपंथी, विद्यार्थी - विद्यार्थिनी , आदिवासी, तसेच सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. तसेच सर्व अधिकारी, विद्यार्थी यांना निबंध स्पर्धा, उत्कृष्ट कर्मचारी अशा प्रकारचे बक्षीस वितरण करण्यात आले.
Post a Comment