पोलिसांच्या दक्षतेमुळे दरोडेखोरांना पकडण्यात आले यश..
भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे
भडगाव:- तालुक्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील दोन जणांना जेरबंद करण्यात पोलिसाना यश आले. तर तीन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत फरार होण्यात यशस्वी झाले आहे. दरोडेखोरांकडून एक पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ गाडी व दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.
दिनांक १४ मे २०२३ रोजी पहाटे ३ वाजे नंतर पारोळा पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राजु जाधव विभागीय गस्त पेट्रोलिंग एरंडोल पोस्टे हद्दीत फिरत असताना भालगाव ता. एरंडोल शिवारात पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ गाडी क्रमांक एम.एच १८ डब्बा ०३७२ रात्रीच्या वेळी संशयास्पद रित्या फिरत असताना पीएसआय राजु जाधव यांनी स्कार्पिओ थांबविण्यास सागितले असता गाडी एरंडोल शहराकडे भरधाव वेगाने निघुन गेली. दरम्यान नियंत्रण कक्ष याच्या सुचनेनुसार कासोदा, भडगाव पोस्टे हद्दीत नाकाबंदी लावण्यात आली. पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ गाडी क्रमांक एम.एच १८ डब्लु ०३७२ ही कासोदा येथील नाकाबंदी बॅरीगेटला धडक देऊन भडगाव कडे येत असताना भडगाव पोलीस स्टेशन कार्यरत पोलीस विलास पाटील, एकनाथ पाटील, स्वप्नील चव्हाण, दत्तू पाटील, चालक राजेंद्र पाटील यांच्या पथकाने भडगाव पो. स्टे. हद्दीत पिंपळगाव फाटा येथे नाकाबंदी लावण्यात आली. यावेळी स्कार्पिओ आडविण्यासाठी ट्रॅक्टर व शासकीय वाहन आडवे लावण्यात आले होते.
सदर संशयित गाडी येताना दिसताच पो.हे.कॉ. विलास पाटील यांनी गाडी थांबविण्याचे सांगितले असता स्कार्पिओ चालकाने पो.हे.कॉ. विलास पाटील याच्या अंगावर गाडी घालुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित भडगाव पोलीस टीमने दरोडेखोर मुकेश विठ्ठल पाटील (वय २४) रा. पाळधी, ता. धरणगाव, रोशन मधुकर सोनवणे (वय ३३), रा. अंबिकानगर, वडजाई रोड, धुळे यांना जेरबंद करण्यात आले. तर त्याचे अन्य तीन साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार होण्यात यशस्वी झाले. सदर आरोपी विरुद्ध पो.हे.कॉ. विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगांव पोलिसात आरोपी मुकेश विठ्ठल पाटील (वय २४) रा. पाळधी, ता. धरणगाव, रोशन मधुकर सोनवणे (वय ३३), रा. अंबिकानगर, वडजाई रोड, धुळे सह फरार आरोपीं विरूद्ध भादवी कलम ३९९, ३०७, ३५३, ३३२, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहे.

Post a Comment