सावकारीचा जाच, हिस्सेदारीचा फास, आयुष्याचाच केला त्याने नाश
जळगाव - शासनाने सावकार विरोधी कायदे कडक केले असून सुद्धा, जळगाव शहरातील कासमवाडी येथील एका रिक्षा चालकाने सावकारीच्या जाचास कंटाळून रेल्वे खाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी 23 मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास असोदा रेल्वे गेटवरील रुळावर घडली आहे. संजय सपकाळे (वय 55 रा. कुवरखेडा ता.जि.
जळगाव ह. मु. कासमवाडी.) भावांनी हिस्सा दिला नाही, हे मूळ कारण असल्याचे त्यांच्या मोबाईलच्या रेकॉर्डिंग वरून समजत आहे.
यातील सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे जैनाबाद येथील येडीमाईची मुलगी(पूर्ण नाव माहीत नाही) हिच्याकडून संजय सपकाळे यांनी व्याजाने पैसे घेतले होते. दर आठवड्याला तीन हजार रुपये देण्याची बोलणी केलेली होती, जर वार चुकला तर एक हजार रुपये अतिरिक्त दंड येडी मायेची मुलगी आकारायची, त्याचबरोबर जैनाबाद येथून अनाधिकृत सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडून संजय सपकाळे यांनी कर्ज घेतलेले होते ते कर्जामुुळे अत्यंत बेजार झाल्याने त्याांनी कर्ज फेडण्यासाठी भावांकडे हिस्सा मागितला असता, भावांनी हिस्सा देण्यास पूर्णतः नकार दिला कर्जाचा डोंगर वाढतच होता रिक्षाचे व्यवसायातून जे काही मिळकत मिळायची ती सगळं कर्जाच व्याज भरण्यातच जात असे. त्यामुळे संजय सपकाळे अगदी बेजार झालेले होते दोन-तीन वेळा विनवणी करून सुद्धा भावांनी त्यांना हिस्सा दिला नाही. शेवटी त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या करून मृत्यूला कवटाळले त्यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले. त्यांच्या रेकॉर्डिंग वरून असे समजते की त्यांच्या मृत्यूला कारणीभूत जैनाबाद येथील अनधिकृत व्याजाचा व्यवसाय करणारे सवकार तसेच भावांनी हिस्सा दिला नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली अशा स्वरूपाची फिर्याद पत्नी कल्पना सपकाळे यांनी शनिपेठ पोलीस स्टेशनला दिलेली आहे.
संजय सपकाळे यांच्या आत्महत्या नसून परिस्थितीने केलेला खून आहे म्हणून त्यांची सखोल चौकशी व्हावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
Post a Comment