श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील यांची आज पुन्हा दुसऱ्या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली
भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे
श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील यांचेवर 2014 मध्ये शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून कलम 353 अन्वये पाचोरा येथील तत्कालीन मंडलाधिकारी एम.एन.पाटील यांनी 2014 मध्ये पाचोरा पोलीस ठाण्यात कलम 353 अन्वये शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यातील सर्व कायदेशीर कामकाज पूर्ण झाल्याने सदर गुन्ह्यातून श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील यांची आज दिनांक 03/05/2023 रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली. श्री.हरिभाऊ पाटील यांच्या तर्फे न्यायालयातील कामकाज ऍड.मा.श्री.सुधाकर काशिनाथ शिरुडे साहेब जळगांव तसेच ऍड.मा.श्री.ललित एम.सुतार साहेब पाचोरा यांनी मा.श्री.शिरुडे साहेबांच्या तंतोतंत मार्गदर्शना नुसार व्यवस्थित मुद्देसूद मांडणी न्यायालयात मांडून व्यवस्थित कामकाज केल्यामुळे श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील यांची दिनांक 03/05/2023 रोजी कलम 353 अन्वये शासकीय कामात अडथळा ह्या गुन्ह्यात न्यायालयाने श्री.तुकाराम हरिभाऊ पाटील ह्यांच्या बाजूने निकाल देऊन त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या गुन्ह्यासंदर्भात पाचोरा येथील कायदेतज्ञ अभ्यासू सुप्रसिध्द ऍड.मा.श्री.प्रल्हाद बी.पाटील साहेब (वाघुलखेडेकर) यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले व त्यांचे अनमोल सहकार्य लाभले.
Post a Comment