ad headr

Powered by Blogger.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

   
     मागील महिन्यात महामंडळामार्फत मातंग समाजातील लाभार्थींना अर्थसहाय्य करण्यासाठी थेट एक लाखापर्यंत कर्ज योजना जाहीर करण्यात आली होती. मात्र अर्ज स्वीकारण्याची मुदत कमी असल्यामुळे बहुतेक लोकांना अर्ज सादर करता आले नव्हते.याची दखल घेत काही संघटनांनी जळगाव महामंडळातील व्यवस्थापकांना अर्ज स्वीकारण्यासाठी मुदत मुदतवाढ मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती. संघटनांच्या मुदत वाढ मागणी विचारात घेऊन महामंडळांनी थेट कर्ज योजनेची अर्ज स्वीकारण्याची मुदत दिनांक 25 जानेवारी 2023 पर्यंत वाढवून दिली आहे.
  जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील लोकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी केले आहे.


No comments