ad headr

Powered by Blogger.

पत्रकार संरक्षण समिति तर्फे पत्रकार दिन साजरा

दि.०६/०१/२०२२
भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे



         दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिन हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने भडगाव येथील पत्रकार संरक्षण समिति तर्फे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी भूषविले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून समितीच्या उत्तर महाराष्ट्र चे कायदा सल्लागार अ‍ॅड. संध्या साळुंखे हे होते. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला माऊली हॉस्पिटल चे संचालक डॉ. गणेश अहिरे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांनी सदस्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख पाहुणे यांच्या भाषणात पत्रकार यांच्या साठी असलेले कायदे व हक्क याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच समिति चे भडगाव तालुका अध्यक्ष दिपक अमृतकार यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला. समितीच्या बाकी पदाधिकारी व सदस्य यांचाही यावेळी जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक अमृतकार यांनी केले व कार्यक्रम नियोजन हे समिति शहर अध्यक्ष मनिष सोनवणे, तालुका उपाध्यक्ष विलास पाटील, प्रकाश बोरसे, सलाउद्दीन शेख, सुनील भोसले, सुभाष ठाकरे , सुभाष पेंटर, अमित देशमुख, रतीलाल पाटील, लक्ष्मीकांत देसले यांनी केले.



No comments