ad headr

Powered by Blogger.

धक्कादायक! भडगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे
दि.२५/०१/२०२३



भडगाव – येथील एका १६ वर्षीय तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करून फोन वर व समक्ष धमकी देऊन हॉटेलच्या रूम मध्ये घेऊन जात इच्छा नसताना बळजबरीने शरीर संबध केला. म्हणून एका विरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला पोस्को सह इतर कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी विजय पाटील रा. यशवंत नगर, भडगाव याने १६ वर्षीय तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करून तरुणीशी फोन वर तसेच समक्ष धमकी देऊन तरुणीला बोलण्यास भाग पाडून तरुणीला दोस्तांना हॉटेल भडगाव येथे भेटण्यास बोलावून दोस्तांना हॉटेलच्या रूम मध्ये तरुणीची इच्छा नसताना बळजबरीने शरीर संबध केला. तसेच तरुणीला बळजबरीने मोटार सायकल वर बसवून पाचोरा रेल्वे स्टेशन येथे घेऊन गेला. तसेच तरुणी मामा कडे जळगाव येथे गेली असताना तेथे जाऊन तरूणीस पळवून घेऊन जाण्याचा इशारा करून पळून गेला म्हणून विजय पाटील रा. भडगाव याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला गुरन.१९२०२३ भा. द. वी. कलम ३७६ (१ ), ३५४ (ड), ५०६ , ५०७ सह लैं. गु.बा. स. अधिनियम २०१२ चे कलम ३ (अ), ४, ११ (१)/ १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.

No comments