भडगाव येथे ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यु
भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे
दि.०१/०२/२०२३
भडगाव:- शहरातील एका इसमास भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने धडक मारली. यात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. वाहन चालकाविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज दु १:३० वाजता घडली.
भडगाव शहरातील गंजी वाडा भागातील मस्जिद जवळ शफीयोद्दिन कमरोद्दिन शेख वर्ष (५०) रा. गंजीवाडा भडगाव यांना सोनाली का कंपनीचे ट्रॅक्ट्रर क्र ए पी - २५ ए आर. ४७०४ ट्रॅक्टर ट्रॉली भरधाव वेगात आणुन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने चालवित आणले. रस्त्याच्या कडेने पायी चालत असलेले शफीयोद्दिन कमरोद्दिन शेख वय ५० रा. गंजी मोहल्ला भडगाव यांना ट्रॅक्टरच्या पुढील उजव्या चाकाने समोरून जोरात धडक मारली. यात ट्रॅक्टर सह गटारीत लोटत घेऊन जाऊन अपघात करून मयताच्या मरणास कारणीभूत ठरला व अपघाताची खबर न देता पळून गेला .म्हणून मयताचे भाऊ शेख बशीर शेख कमरोद्दीन , राहणार गंजी मोहल्ला भडगाव यांच्या फिर्यादी वरून भडगाव पोलिस स्टेशनला ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भादवी कलम ३०४ (अ), २७९ , ३३७, ३३८, मोटर वाहन कायदा १८४, १३४ , (ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.

Post a Comment