शेतकऱ्यांनी स्वतःहून खड्डे बुजून केले दुरुस्तीचे काम व प्रशासनाचा केला निषेध ..
भडगाव -नाचनखेडा भडगाव रोड या रस्त्याची स्थानिक शेतकरी व नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्ती व्हावी अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्या गेल्याने नादुरुस्त रस्त्याचे दुपारी त्रयस्थ शेतकऱ्यांनी स्वतःहून खड्डे बुजून दुरुस्तीचे काम हाती घेतले . रस्त्यावरील अनेक खड्डे रस्त्यावरील मातीने बुजून चालण्यासाठी योग्य जागा शेतकऱ्यांनी बनविली. प्रशासन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी बोलून दाखवीली.
भडगाव नाचणखेडा रस्त्याची माजी खासदार एम. के. अण्णा पाटील यांच्या कार्यकाळात दुरुस्ती व काम झाले होते. त्यानंतर हा रस्ता खराब झाला. त्याची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी काही वर्षांपासून शेतकरी ,नागरिक, विद्यार्थी यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार , आमदार , खासदार आदींकडे सातत्याने पाठपुरावा करून मागणी करीत आहे .मात्र शेतकऱ्यांच्या या निवेदनाकडे सर्वांनी दुर्लक्ष केलेले दिसुन येत आहे. दिलेल्या निवेदनाना केराची टोपी दाखवल्याचे दिसते. म्हणूनच या रस्त्याकडे अनेक वर्ष होऊनही प्रशासन, शासन काम करू शकले नाही. अद्याप रस्त्याचे काम अपूर्ण आहे. रस्त्यावर रस्त्याहून येण्या जाण्यासाठी पूरक जागा नसल्यामुळे सायकल ही धड चालत नाही. काही विद्यार्थ्यांनी भडगाव येथील शाळेत जाण्यासाठी दुर्लक्ष केले आहे. नाचणखेडा पर्यंत वाहण जाण्यास अडचण असल्याने, काहीच विद्यार्थी पायपीट करत या रस्त्यावरून भडगाव पर्यंत प्रवास करतांना दिसतात. शेतकऱ्यांना धड चांगला रस्ता नसल्यामुळे शेतामध्ये नगदी व बागायत पिकं घेता येत नाही . वाहन शेतापर्यंत जात नाही . स्वतःचे मोटरसायकल शेतापासून एक दोन किलोमीटर अंतरावर सोडून शेतात पायपीट करत जावे लागते. बऱ्याचदा रस्त्यावर असलेल्या खापरखेडा वस्ती भागात आजारपणाला सामोरे जाताना रुग्णवाहिका ही खेड्यावर जाऊ शकत नाही . अशी परिस्थिती या रस्त्याची आहे. येथील आजारी बालक, महिला, व वृद्ध यांना पायपीट करत तीन ते चार किलोमीटर भडगाव येथे दवाखान्यात यावे लागते.
प्रशासनाकडे येथील रस्ता व्हावा या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी संघटना , विद्यार्थी,नागरिक, स्थानिक शेतकरी, यांचा पाठपुरावा सुरू आहे . मात्र अद्याप रस्ता मंजूर झाला नाही . त्यामुळे आज त्रयस्थ शेतकऱ्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजून निषेध व्यक्त करत स्व मेहनतीने रस्त्याची तात्पुरती सुविधा उपलब्ध करून घेतली. या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण पूर्ण व्हावे अशी मागणी प्रवेश शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
Post a Comment