टेकवाडे खुर्द येथील महिलेचे प्राण वाचविणारे शौर्यवीर शिवाजी भिल्ल यांचा योजना पाटील यांनी केला सत्कार
भडगांव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील टेकवाडे खुर्द येथील सुमनबाई पाटील ही महिला टेकवाडे खुर्द गावालगत गिरणा नदीच्या पाण्यात वाहत वाडे गावाच्या कहीट पटांगण वस्तीलगतच्या गिरणा नदीच्या पाञात वाहुन आल्या होत्या. वाडे येथीलच शिवाजी भिल्ल यांच्या लक्षात येताच त्यांनी नदीच्या पाण्यात उडी मारुन या महिलेला पाण्यातुन बाहेर काढले. महिलेला भडगाव ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करून प्राण वाचविले. या शौर्याबद्दल शिवाजी भिल्ल यांचा सन्मान सत्कार भडगाव पो. स्टे. महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील, पञकार अशोक परदेशी, साहेबराव पाटील टेकवाडे खुर्द आदिंच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल देउन करण्यात आला. यावेळी संबंंधित महीलेचे नातेवाईक मंडळी, मदत करणारे वाडे येथील भिमसिंग परदेशी, रुग्णालयातील कर्मचारी हजर होते.

Post a Comment