ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता अॅड. प्रकाश उंटवाल यांनी केला जोरदार युक्तिवाद
औरंगाबाद येथील सत्र न्यायालयाने अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती गुन्ह्यातील चार संशयित आरोपींची अॅड. प्रकाश एस. उंटवाल यांनी आरोपींची बाजू जोरदार आणि मुद्देसूद युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्दोष मुक्तता केली आहे. सदर प्रकरणाची हकीगत खालील प्रमाणे.
प्रस्तुत प्रकरणातील सेक्शन केस क्रमांक 198/2018 पोलीस स्टेशन सिल्लोड ग्रामीण गुन्हा रजिस्टर क्रमांक 0 374 / 2017 कलम 323,504,506,34 भा.द.वि.तसेच कलम 3 (2) (Va)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 महाराष्ट्र शासन विरुद्ध 1) किशोर रोहिदास शिंदे 2) सौ. योगिता किशोर शिंदे 3) समिंदराबाई रोहिदास शिंदे, सर्व राहणार केळगाव तालुका सिल्लोड जि.औरंगाबाद या प्रकरणांमध्ये तपासिक अमलदार श्री. गणेश विराधार साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी, सिल्लोड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. प्रस्तुत प्रकरणात एकूण चार साक्षीदार यांची साक्ष सरकारी पक्षातर्फे मा.न्यायालयात घेण्यात आली होती. प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी तसेच इतर साक्षीदाराच्या तफावतीमुळे सदर प्रकरणातील सर्व आरोपीची मा.जिल्हा व सत्र न्यायालयाने दिनांक 22/ 08/ 2022 रोजी निर्दोष मुक्तता केली आहे.प्रस्तुत प्रकरणात मा.श्री एस. के.कुलकर्णी साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब 04 यांनी प्रस्तुत च्या प्रकरणातील सर्व आरोपींना संशयाचा फायदा देऊन सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सर्व आरोपीतर्फे अॅड. श्री प्रकाश एस उंटवाल यांनी बाजू मांडली.

Post a Comment