ad headr

Powered by Blogger.

क्रीडा दिन विशेष, खेळाडू वृत्तीमुळेच कोरोना कक्षात बसून’मृत्यू घराचा पहारा’पुस्तक लिहू शकलो‘मृत्यूकार विनोद अहिरे’

आज राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष यानिमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलातील लेखक, साहित्यिक, कवी, समीक्षक पो.ना.विनोद पितांबर अहिरे पोलीस मुख्यालय जळगाव यांच्याकडून

२९ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. केव्हा कोरोना आपल्यावर वरचढ होत होता, तर कधी आपल्या आंतरिक उर्जेमुळे आपण कोरोणावर मात करीत होतो.आणि संपूर्ण जगामध्ये कोरोना आणि मानवप्राणी यांच्यामध्ये हा खेळच सुरू होता. असे म्हणायला हरकत नाही.

पण शेवटी मानव प्राण्याने कोरोनाला आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर चारीमुंड्या चीत केले!

माझं वैयक्तिक मत असं आहे की, प्रत्येकाने एक तरी खेळ आपल्या जीवनामध्ये जोपासला पाहिजे. कारण खेळामुळे जिंकण्यासाठी उर्मी निर्माण तर होतच असते; पण अपयश पचवण्याची शक्ती देखील आपल्याला प्राप्त होत असते..!या माध्यमातून आपल्या मध्ये खिलाडूवृत्ती निर्माण होते ती आपल्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा संघर्ष करण्याची प्रेरणा देत असते. “अक्षरशः आपण अपमानाचे घोट पचवून, वेदनेचा सागर गिळून त्याचे खवळलेल्या ज्वालामुखीत रुपांतरीत करू शकतो. “ही ताकत, ही शक्ती, ही ऊर्जा फक्त नि फक्त खेळाडू वृत्तीमुळेच आपल्या अंतरंगात निर्माण होऊ शकते.

इतर कोणाची उदाहरण देण्यापेक्षा माझेच उदाहरण मी देऊ इच्छितो २०१८ मध्ये माझ्यावर प्रचंड मोठे संकट काही झारीतील शुक्राचार्यामुळे माझ्यावर आले होते. त्या संकटाला मी माझ्यातील खिलाडूवृत्ती मुळे आणि छत्रपती शिवाजी महाराज,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या जोपासणे मुळेच मी त्या संकटांना मोठ्या धैर्याने सामोरे जाऊ शकलो. आणि २०१९ मध्ये माझ्या ४०व्या वाढदिवशी ४० किलोमीटर स्केटिंग करून अशा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारा देशातील पहिला पोलीस ठरलो. हे फक्त लहानपणापासून माझ्या वडिलांनी पुढाकार घेऊन वयाच्या 10व्या वर्षी कराटे प्रशिक्षण वर्गात घातल्यामुळे शक्य झाले. त्याचबरोबर जलतरण,स्केटिंग हॉर्स रायडिंग या खेळांना(छंदांना) मी माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच बनवून टाकले. आणि अजूनही 4३ व्या वर्षी सुद्धा उत्साहाने स्पर्धेमध्ये मी सहभागी होत असतो.हरण्याची पर्वा न करता..!
एक हिंदी कवी ने असे म्हटले आहे.
तू दौंड में अव्वल आये, ये जरुरी नही
तू सबको पीछे छोड दे, हे भी जरूरी नाही!
जरुरी है तेरा, दौंड मे शामिल होना,
जरुरी है तेरा, गिरकर फिरसे खडा होना!
जिंदगी में इम्तेहान बहुत होंगे,
आज जो आगे है, कल तेरे पीछे होंगे!
बस तू चलना मत छोडना,
बस तू लडना मत छोडना…!

त्याकरिता मी प्रत्येक आई-वडिलांना सांगेल की, अभ्यास मुलांनी केलाच पाहिजे..! याबद्दल दुमत असू शकत नाही. परंतु त्याबरोबर खेळ भावना सुद्धा आपल्या मुलांना जोपायला शिकवली पाहिजे..! हे संस्कार आपण मुलांवर रुजवले पाहिजे,
जेणे करुन आपण सासक्त आणि बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण होईल.

२०२०मध्ये कोरोना या महामारी बद्दल जनमानसात प्रचंड अशी भीती होती. आणि त्याला पोलिसही अपवाद नव्हते. मृत्यू म्हणजे कोरोना आणि कोरोना म्हणजे मृत्यू असेच समीकरण निर्माण झाले होते. आणि त्यावेळी माझी कोरोना कक्षात ड्युटी लावण्यात आली होती.परंतु नियमित खेळामुळे माझ्यात निर्माण झालेल्या अंतरिक ऊर्जेमुळे मी कोरोना कक्षातील (ड्युटी)कर्तव्याला सक्षमपणे सामोरे गेलो आणि कोरोनामुळे मृत्यूची भीती असून सुद्धा, प्रत्यक्ष कोरोना कक्षात बसून “मृत्यू घराचा पहारा” हे देशातील पहिले पुस्तक लिहू शकलो. याचे एकमेव कारण म्हणजे खेळामुळे माझ्यामध्ये निर्माण झालेली खिलाडूवृत्ती.

म्हणून शेवटी एवढेच सांगेल की ज्या ठिकाणी जायला कोणी धजत नाही, त्या ठिकाणी जाण्याचे धाडस फक्त खेळाडूच करू शकतो. म्हणूनच एक शेर आपणास सांगावासा वाटतो
सुना है समंदर को बडा गुमान आया है,
तो ले चलो उदर ही कश्ती,
जिधर तुफान आया है …!

पो.ना.विनोद पितांबर अहिरे पोलीस मुख्यालय जळगाव
९८२३१३६३९९
लेखक महाराष्ट्र पोलीस दलातील
साहित्यिक,कवी,समीक्षक आहेत.

No comments