ad headr

Powered by Blogger.

"बहीणाबाई म्हणजे ज्ञानपीठ होय"- सुनिल पाटील

भडगाव - निसर्गाच्या सानिध्यात झाड,वेली,पाने, फुले,पशु,पक्षी यांचे सुश्म निरीक्षणाने काव्यनिर्मीत होते बहिणाबाईंच्या काव्यातुन शेती,चालीरीती संस्कृतीचे दर्शन घडते, त्या अशिक्षित असुनही त्यांनी चालीरीती परंपरा व शिक्षणाविषयी काव्यातुन ताशेरे ओढले आहे. ज्ञानाला सिमा नसते अशी बहिणाबाईं म्हणजे ज्ञानपीठ होय- असे विचार प्राचार्य सुनिल पाटील यांनी "कवयित्री  बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर कवितेच्या माध्यमातून प्रभाव" या विषयावर मार्गदर्शन केले.ते कवयित्री बहिणाबाईंच्या जयंती निमित्ताने बोलत होते.
     कार्यक्रमाच्या प्रारंभी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ महिला सकवारबाई महाजन व सरलाबाई पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हरीश जोशी,भगवान जाधव, मयुर पाटील,लक्ष्मण पाटील, निखिल पाटील,भगवानराव पाटील या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीश जोशी तर सुत्रसंचालन लक्ष्मण जाधव तर आभार प्रदर्शन सुभाष तात्या यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन श्री लक्ष्मी नारायण मंदिर बांबरूड बु. व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.यावेळी मंदिरात विद्यार्थी,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

                        भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे

No comments