ad headr

Powered by Blogger.

भडगांव तहसील व पोलिस स्टेशन येथील राष्ट्रीय ध्वजारोहणाच्या जागेवर व आवारात अतिक्रमण, वाहणे उभी करण्यासाठी जागा नाही...

भडगांव-पोलिस स्टेशन व तहसील आवारात राष्ट्रीय ध्वजारोहण जागेवरच विविध खाजगी व्यवसाय धारकांनी अनधिकृत टपऱ्या टाकुन ध्वजस्तंभ आवारात कब्जा घेतला आहे. सदर व्यवसाय धारक हे त्या टपरीवर १ लाख डिपाझिट व पाच हजार महीना भाडे तत्वावर देत आहेत.. वास्तविक सदर तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन आवारात संबधित अधिकारी यांनी अवैध व्यवसाय धारकांना परवानगी कशी दिली, त्यातून त्या अधिकाऱ्यांना काही फायदा तर होत नाही ना? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहेत.
 ध्वजस्तंभाच्या आवारात वास्तविक ५० फुटा पर्यंत अतीक्रमण नको..या ठिकाणी पुर्वापार सार्वजनिक ध्वजारोहण, राष्ट्रीय कार्यक्रम,स्वातंत्र्यदिन, यासह अनेक शासकीय कार्यक्रम होत असतात.. परंतू या जागेवर सर्व खाजगी व्यवसाय व भाडे तत्वावर दुकानदारी चे अतीक्रमण करण्यांत आले आहे...सदर प्रकरणी म.तहसीलदार सो व पोलीस निरीक्षक सो.भडगांव.यानी सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत तात्काळ व्यक्तीगत दखल घेऊन आपल्या आवारातील भाडोत्री अनधीकृत अतीक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात यावी.

                  भडगाव प्रतिनीधी- सुभाष ठाकरे

No comments