सौ. साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर आमडदे या शाळेतून भूमिका भोसले हिची नवोदय शाळेसाठी निवड
आमडदे-कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित सौ. साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, आमडदे या शाळेतील इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी भूमिका दीपक भोसले या विद्यार्थिनीची निवड जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव या ठिकाणी झाल्याने तिचा सत्कार संस्थेचे चेअरमन व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या शुभहस्ते पेढे भरून व फुलगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिचे पालक डी. टी. भोसले सर व दीपक भोसले सर गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच डॉ.रावसाहेब पाटील नारायण किसन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर आर वळखंडे सर पर्यवेक्षक एस पी पाटील सर यांनी सुद्धा भूमिकाचा सत्कार करून कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सोनवणे सर यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते
आमडदे प्रतिनिधि

Post a Comment