भडगाव शहरात प्रशासन सुस्त, रस्त्यावर गुरेढोरे मस्त
भडगाव -भडगाव नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष नसल्यामुळे प्रशासन कार्यरत आहे. त्यामुळे नगरपालिकेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी हेच भडगाव नगरपालिकेचे सर्वेसर्वा आहेत. मुख्य प्रशासकीय अधिकारी हे भडगाव शहरातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचा आव आणत असतात. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. रस्त्याची दुर्दशा तर रस्ते कोणते आणि खड्डे कोणते हेच समजायला मार्ग नाही. कोरोना काळामुळे दोन वर्षांनंतर शाळा सुरू होत आहेत, विद्यार्थी क्लासेस व शाळेसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात परंतु रस्त्यावर मोकाट फिरत असलेल्या गुरांमुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गाडी चालवत असताना मध्येच मोकाट जनावर रस्त्यावर येतात आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे, करिता भडगाव नगरपालिकेने वेळीच लक्ष देऊन रस्त्यावरील मोकाट गुरांचा बंदोबस्त करून विद्यार्थी व गाडी चालक सुरक्षित राहतील याबाबतची दक्षता घ्यावी.
भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे

Post a Comment