ad headr

Powered by Blogger.

पदोन्नती झाली तरी पोलीस अधिकारी मूळ पदाला चिटकून



बराच वेळा शासन पोलिसांच्या पदोन्नती बाबत वेळ काढूपणाचे धोरण अवलंबते किंवा उदासीन असतं. मात्र ठाणे विभागाचे लचलुचपद विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांचा अजबच कारभार समोर आला आहे. उगले यांची ठाणे विभागाच्या लाचलुचपद विभागाच्या पोलीस उप-महानिरीक्षक पदी पदोन्नती झाल्यावर देखील पंजाबराव उगले यांनी ठाणे विभागातील विभागाचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार सोडायला तयार नाहीत, याबाबत पोलिस दलाल आश्चर्य व्यक्त केले जात आहे  पंजाबराव उगले हे दोन वर्षांपूर्वी जळगाव पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याबद्दल जळगाव जिल्हा पोलीस दलातून निवृत्त झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, उगले हे अत्यंत स्वार्थी अधिकारी असून त्यांच्या फायद्यासाठी हाताखालील अधिकारी कर्मचारी यांचा बळी द्यायला देखील मागेपुढे ते पाहत नाही. त्यांनी कोरोना काळात एक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचारी यांना सखोल चौकशी न करता त्यांना खात्यातून बडतर्फ केले होते, परंतु ते कर्मचारी व पोलीस निरीक्षक पुन्हा खात्यात रुजू झालेले आहेत. अशी वादग्रस्त कारकीर्द त्यांची राहिलेली आहे. बऱ्याच वेळेला पोलीस अधिकारी पदोन्नती वेळेत होत नाही म्हणून नाराजी व्यक्त करत असता परंतु पंजाबराव उगले हे पदोन्नती होऊन सुद्धा पोलीस उप-मानिरीक्षक पदी पदोन्नती होऊन सुद्धा पोलीस अधीक्षक पदाचा चार्ज का सोडत नाही याबाबत पोलीस खात्यातून चर्चेला उधाण आले आहे.

No comments