भडगांव पो. स्टे. दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांनी मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांचेकडे विविध समस्या सोडविण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी
भडगांव प्रतिनिधी
दि.१६/०७/२२
भडगाव: भडगांव पो. स्टे. दक्षता समिती अध्यक्षा मा. नगरसेविका योजना पाटील यांनी भडगाव नगरपरिषद मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांना पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या विविध समस्यावर उपाययोजनेचे नियोजन करून त्वरित सोडविणे व प्रलंबित कामे होणे बाबत निवदनाद्वारे मागणी केली आहे.
सदर निवेदनात बाळद रोडवरील विविध ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते तेथे मुरूम किंवा कचखडी टाकणे, शहरातील सर्व ओपन स्पेस मधील साचलेले पाणी काढणे व स्वच्छ्ता अभियान राबऊन डेंगू, हिवताप, चिकनगुनिया इ. सारखे आजार होणार नाहीत यासाठी औषध फवारणी करणे, विविध ठिकाणी स्ट्रीटलाइट बंद आहेत ते बसविण्यात यावेत. पाणी पुरवठा दूषित होणार नाही याबाबत योग्य ती काळजी घेण्यात यावी. अशा विविध समस्याबाबत योजना पाटील यांनी मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांचेशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. मुख्याधिकारी यांनी वेळीच सर्व नियोजन सुरु आहे असे सांगितले. तसेच बाळद रोड कॉंक्रीटीकरणाचे काम लवकरच सुरु होईल आणि विविध ओपन स्पेस सुशोभिकरण विकसितसाठी मंजूरी मिळाली आहे ते कामही लवकरच सुरु होईल असे आश्वासित केले आहे.

Post a Comment