टायगर ग्रुप धरणगांव शहराचे प्रमुख सदस्य चेतन भाऊ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरीब व गरजु विद्यार्थ्याना शालेय वस्तु व खाऊ वाटप
धरणगाव - टायगर ग्रुप धरणगांव शहराचे प्रमुख सदस्य चेतनभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरीब व गरजु मुला- मुलींना वह्या व शालेय वस्तु वाटप व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. वाढदिसानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात आला असून, टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष जालिंदर जाधव, टाइगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव, उत्तर महाराष्ट्राचे बुलंद आवाज सागर कांबळे ,तसेच टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर, यांच्या मार्गदर्शनाखाली आज वह्या, पेन्सिल, कंपास व इतर शालेपयोगी वस्तू वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या वेळी प्रथम सूर्यवंशी, नामदेव मराठे ,आशुतोष पाटील, भुषण महाजन, कृष्णा खैरनार, गुंजन देशमुख, अक्षय राजपुत, निलेश महाजन, बाळा पाटील, प्रमोद जयराज, कमलेश पाटील, कन्हैया पाटील, अंकित साळुंखे, अतुल सोनवणे, शुभम नेतकर, चौत्राम सोनवणे, दिपक मराठे, भुषण तडेराव, कल्पेश पवार व आकाश पाटील इ. कार्यकर्ते उपस्थित होते.वाढदिवसानिमित्त राबवलेल्या उपक्रमाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला.
टायगर ग्रुप हि एक सामाजिक संघटना आहे.टायगर ग्रुपचे वैशिष्ट म्हणजे समाजसेवा व गोर गरीबांना मदत करणे. समाज 'सेवा हीच ईश्वर सेवा' हे टायगर ग्रुपचे ब्रीद वाक्य आहे.
Post a Comment