केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा नाभिक समाजाकडून भडगाव येथे जाहीर निषेध.....
भडगाव-केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे एका कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकार वर टीका करत असताना नाभिक समाजाबद्दल अपमानास्पद व वादग्रस्त उल्लेख केला. सलून व्यवसायिक जसे अर्धवट काम करतात तसं महा विकास आघाडी सरकार चा कारभार सुरू आहे असे दानवे यांनी वक्तव्य केले होते त्या विरोधात तहसीलदार भडगाव यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला व समाजाची माफी मागावी अशी मागणी केली, यावेळी समाजाचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष भरत भाऊ चव्हाण, सचिव हिलाल नेरपगार तसेच रवींद्र शिरसाट, दयाराम लाला ठाकरे, दीपक शिरसाट, नाना नेरपगार, प्रभाकर नेरपगार, गोरख वेळेसकर, भारत ठाकरे ,नाना महाले, बाळा साहेब ठाकरे, विजय ठाकरे, राजू महाले ,नाना शिरसाट , विनोद शिरसाठ, निलेश महाले इ. समाजबांधव उपस्थित होते...
भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे
Post a Comment