गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमीत्त महिला शिक्षिकांचा गौरव...!!!!
कोळगाव ता.भडगाव -कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे जागतिक महिला दिनानिमीत्त विद्यालय तथा महाविद्यालयातील महिला शिक्षिकांना गुलाब पुष्प व भेट वस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले.
सदर कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षिका प्रा.श्रीमती माया मराठे,सौ.सिमा शिसोदे,प्रा.सोनाली सोनवणे,प्रा.प्रविणा पाटील,प्रा.प्रतिभा केदार,प्रा.मनिषा बोरसे,सौ.तृप्ती भामरे,सौ.सरिता पाटील,सौ.चारुलता पाटील आदि शिक्षिकांचा सन्मान प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार तसेच इतर शिक्षक-शिक्षकेतर बांधवांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील तसेच महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांनी मिळून शाळेस जागतिक महिला दिनानिमीत्त सुंदर अशी समई भेट म्हणून प्राचार्य सुनिल पाटील तसेच पर्यवेक्षक अनिल पवार यांना सुपूर्द केली.
सदर नावीण्यपुर्ण कार्यक्रमाचे संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव पाटील, संस्थेच्या सचिव तथा दुध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील यांनी कौतुक केले आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
Post a Comment