ad headr

Powered by Blogger.

तहसीलदार यांच्या अक्त्यारितले (R,R) अर्थात रेती आणि रेशन यांचे धंधे भ्रष्टाचाराच्या विळख्यात..

 

अमळनेर [ प्रतिनिधी]. जळगाव जिल्ह्यातील स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्रथम क्रमांक मिळालेल्या अमळनेर नगरीत अनेक बेकायदेशीर धंद्यांना अर्थात व्यवसायांना ऊत आला आहे. प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांचा कार्यक्षेत्रात येणाऱ्या व्यवसायांवर अंकुश राहिलेला दिसत नाही. असे प्रत्येक वेळा निदर्शनास येते. एखाद दोन टक्के कारवाई दिसते परंतु त्या व्यवसायांची खोली खूप खोलवर दिसून येते. अमळनेर शहराच्या बोरी नदी पात्रातून उत्तरेला लाडगाव तर दक्षिणेला हिंगोणे सिम इथपर्यंत रेती वाहतूक करणारे रेती चोर आणि त्यांची रेती भरलेली वाहने दृष्टीस पडतात. त्याच्या सर्वसामान्य नागरिकांना ,रहदारी करणाऱ्यांना अत्यंत वाईट अनुभव येतो. तहसीलदार साहेबांनी बैठे पथक कार्यरत केले असून त्यांची सुद्धा डोळे झाक चालू आहे. रेती माफियांच्या जीवावर  निगरगठ  यंत्रणा हतबल झालेली दिसते. 



काल परवा रेशनच्या दुकानांचा गोरख धंदा अर्थात बोगस संस्थेवर चालणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांचा पुराव्यासहित बुरखा फाळण्यात आला. एखाद दोन दैनिक, साप्ताहिकात तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियावर अर्थात पोर्टलवर बातम्या चालल्या परंतु जसे काही अंमळनेर शहरांमध्ये व तालुक्यामध्ये काही घडलेच नाही अशा अविर्भावात सर्व आलबेल चाललेले आहे. प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा  नायनाट करण्यासाठी पावलं उचलावीत हीच सुज्ञ अमळनेर करांची अपेक्षा.

No comments