अमळनेर नगरीतील राष्ट्रीय महापुरुषांचे तसेच बहुजन महामानवांचे स्मारके धूळ खात पडलेली.
अमळनेर (प्रतिनिधी). अमळनेर शहरामध्ये चौका चौकावर अनेक बहुजन महामानवांचे स्मारके नगर प्रशासनाकडून बांधण्यात आलेले होते. स्मरण दिवस किंवा जयंतीदिनी फक्त या महापुरुषांच्या स्मारकांची जबाबदार अधिकाऱ्यांना आठवण येते. धुळे रोड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बनवलेले आहे. थोड्याशा जागेत बनवलेले हे स्मारक अत्यंत तुंगार व देखण्या स्वरूपात आहे.
परंतु 18 जुलै 2025 रोजी अण्णाभाऊंचा स्मृती दिवस होता. त्यादिवशी त्या स्मारकाची साधी साफसफाई केली नाही किंवा परिसरातील घाण ,कचरा, काटेरी झुडपे
तोडण्यात आलेली नाहीत. गेंड्याच्या कातडीचा प्रशासन अजून किती निगरगठ पणे कर्तव्याकडे दुर्लक्ष करेल हा प्रश्न अधोरेखित होतो. बहुजन समाजाचा तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा रोष ओढवण्याच्या अगोदर तेथील साफसफाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
Post a Comment