विप्रो कंपनीच्या लोडेड गाड्याचा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रस्ता बंद. नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे घृणास्पद दर्शन. रस्त्यांची अक्षरशा चाळण.
अमळनेर { प्रतिनिधी }....दीपक पाटील. रेल्वे बोगद्याच्या उत्तरे कडे विप्रो कंपनी असून त्या विप्रो कंपनीला कच्च्या मालाचे व पक्क्या मालाचे अवजड वाहने लोडेड स्वरूपात येत जात असतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विस्कळीत कामांमुळे आणि दिरंगाईमुळे पोट गटारींचे अत्यंत निंदनीय काम सुरू असून खोदकाम करून घेतात परंतु रस्ता दुरुस्त करत नाहीत एस्टिमेट प्रमाणे पॅचेस लगेच तयार करून नागरिकांना वापरण्यायोग्य करत नसल्यामुळे अनेक अपघात तसेच दुचाकी चार चाकी वाहने खड्ड्यात अडकतात परिणामी मानसिक शारीरिक त्रास उद्भवतो या सर्व प्रकाराने नागरिक त्रस्त असून बंगाली फाईल रामवाडी तांबेपुरा विप्रो कॉलनी या परिसरात तसेच साने नगर न्यू प्लॉट या प्रभागात पालिकेच्या व एमजेपीच्या कामांचे विपरीत परिणाम नागरिकांच्या दिनचर्येवर होत असतात. सोशिक नागरिक असल्यामुळे प्रशासनाचे आशी दिरंगाई व विस्कळीत कारभार सहन करत आहेत परंतु सहनशीलतेचा अंत झाल्यास नगरपालिका प्रशासनातील जबाबदार अधिकारी आणि जीवन प्राधिकरण योजनेतील विकासक ठेकेदार सब ठेकेदार आणि काम करणारे कारागीर यांच्या विरोधात जनतेच्या भावना तीव्र होऊन मोठा वाद उद्भवण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. जर वाद उफाडला त्यामध्ये काही दुष्परिणाम झाला तर ही सर्वस्वी जबाबदारी कोणाची असेल असे सुज्ञ नागरिकांना भीती वाटते. मुख्याधिकारी तसेच ठेकेदार यांना पावसाळ्यातच जीवन प्राधिकरणाचे काम सुचतात का? आणि लोकांचे गैरसोय करण्यात ते धन्यता मानतात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विप्रो कंपनी मध्ये येणाऱ्या अवजड वाहन बाहेर राज्यातून येत असतात त्यांच्या गैरसोयी कडे कोणाचेही लक्ष नाही. त्यांची वाहने खड्ड्यांमध्ये अडकली तर क्रेन वाले , किंवा मदत करणारे काही माणुसकी शून्य नागरिक यांच्याकडून त्यांची आर्थिक लूट होण्याची दाट शक्यता असते. अशा अनेक तक्रारी नित्याच्या झालेल्या आहेत. तांबेपुरा, साने नगर, बंगाली फाईल परिसरामध्ये लोकशाही नुसार कारभार चालू आहे किंवा नाही. की आम्ही पृथ्वीच्या बाहेर वास्तव्यास आहोत असे नागरिकांना अनेक प्रश्न भेडसावतात. नगरपालिकेच्या सर्व विस्कळीत कारभारामुळे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांची नाचक्की होत आहे. त्याचे त्यांना काहीही घेणे देणे किंवा सोयर सुतक नाही असे वाटते. ठाणे नगर तांबेपुरा ,बंगाली फाईल ,केशवनगर इत्यादींच्या रस्त्यांकडे जलद गतीने प्रशासनाने लक्ष,न दिल्यास नागरिकांचा रोष ओढवण्याची शक्यता आहे .आणि सहनशीलतेचा अंत झाल्यास नागरिकांचे आंदोलन नगरपालिका वर येण्याची कुजबूज सुरू आहे.
Post a Comment