तू मांग समाजाचा आहे तुला नोकरी करता येणार नाही.
जामनेर प्रतिनिधी. जामनेर येथील इंटरनॅशनल स्कूल येथे भूषण चव्हाण नामक अनुसूचित जातीच्या शिक्षकाला तू मांग समाजाचा आहे म्हणून तुला शिक्षक होता येणार नाही. असा खळबळ जनक आरोप करून नोकरी नाकारणाऱ्या संस्थाचालक, संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापिका यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अन्याय ,अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्वरित गुन्हा दाखल करून संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेची मान्यता रद्द करावी या आशयाचे निवेदन एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानेआमच्या प्रतिनिधींना दिले आहे. खाजगी शिक्षण संस्थेमध्ये अनुसूचित जाती जमातींच्या शिक्षकांना शिक्षक म्हणून नियुक्ती देणे बऱ्याच संस्थेमध्ये सुरू आहे. जिल्ह्यातील ज्या ज्या संस्थेमध्ये अनुसूचित जातीच्या शिक्षकांना भरती केलेले नसेल अशा सगळ्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या संस्थेच्या इमारतींना कुलूप लावले पाहिजेत अशी मागणी या निवेदनात केलेली आहे. जामनेर येथील या खेदजनक प्रकाराने संपूर्ण जिल्हा तसेच राज्यात खळबळ उडालेली आहे. या निमित्ताने जातीवादाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी नागरिकांचे मत आहे.
Post a Comment