भडगाव येथे शेत रस्ते तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन.
भडगाव { प्रतिनिधी } ...सुभाष ठाकरे.
महसूल प्रशासनाच्या वतीने शेत रस्ते व शिव रस्ते तक्रारीबाबत तहसील कार्यालय भडगाव येथे दि.०३/०७/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत शेत रस्ते तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
१) सदर मेळाव्यात खालील प्रमाणे रस्त्यांच्या तक्रारी असल्यास त्या अनुषंगिक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत.
a ) गाव नकाशा वरील अतिक्रमित रस्ते.
b ) दोन गावांच्या मधील अतिक्रमित शिव रस्ते
c )ज्या शेत रस्त्याच्या बाबतीत तहसीलदार, उपविभागीय, अधिकारी, जिल्हाधिकारी, मा. उच्च न्यायालय यांचेकडील आदेश झालेला आहे. मात्र तरी तेथील एखादी व्यक्ती अडथळा करत आहे.
2) पूर्वापार वहिवाटीचा रस्ता आज रोजी बंद केला असेल तर मामलेदार कोर्ट ऍक्ट १९०६ चे कलम ५ अन्वये तसेच शेतीस रस्ताच उपलब्ध नाही अशा बाबतीत नवीन रस्ता मिळण्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ अन्वये अर्ज दाखल करावा.
३) उपरोक्त नमूद बाबतीत अर्जासोबत. खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करावीत
a) रू.10 चा स्टॅम्प लावलेला अर्ज.
b) अर्जदाराचा प्रतिज्ञा लेख साध्या कागदावर .
c) अर्जदार व सामनेवाले यांचे नावे व पत्ते.
d) अर्जदार व सामने वाला यांचे 7/12 उतारे.
e)भूमी अभिलेख कडील चतु:सीमा नकाशा व शिवार नकाशा.
f) रस्त्यांसंबंधी खरेदी खत असल्यास त्याची प्रत व अन्य पुरावे.
g) वरिष्ठ न्यायालयाचे आदेशाची प्रत.
दिवाणी न्यायालय दाखल /स्थगिती असलेले प्रकरणाबाबत कृपया अर्ज करू नये.
अशी माहिती भडगाव तहसीलदार शितल सोलाट यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली.
Post a Comment