श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाचे वतीने आषाढी एकदशी उत्साहात साजरी .
भडगाव:- प्रतिनिधी.. सुभाष ठाकरे .
शहरातील शिवाजीनगर भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी व संत सेना महाराज मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळ पासूनच गर्दी केली होती. मंदीरात हभप श्री लक्ष्मण खैरनार यांचे भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करत विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला होता. यात लक्ष्मण खैरनार व टीमने विठ्ठल नामाची विविध भजन सादर करत उपस्थितांना भक्ती रसात तल्लीन केले. यावेळी संजय पवार पत्रकार यांनी" तुम्ही देव पाहिला का" हे भजन सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. त्यानंतर दुपारी १२ वाजता नगरपरिषद मुख्याधिकारी रवींद्र लांडे, मंडळाचे अध्यक्ष संजय पवार, सचिव अॅड भरत ठाकरे महाआरती करण्यात आली. त्यानंतर फराळ व केळी वाटप करण्यात आले. दरम्यान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, नगरपरिषद मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांनी मंदिरात सपत्नीक भेट देत दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी नाभिक मंडळाचे वतीने पो.नी. पांडुरंग पवार व मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संजय पवार (पत्रकार) उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ, सचिव अॅड भरत ठाकरे, खजिनदार दिपक शिरसाठ, कार्यकारिणी सदस्य सुभाष ठाकरे, दिलीप शिरसाठ, विनोद शिरसाठ, कीशोर निकम, भगवान नेरपगारे, नामदेव चव्हाण सुर्याभान वाघ, नितीन शिरसाठ, राकेश शिरसाठ, निलेश महाले (पत्रकार), भास्कर पवार, काशिनाथ शिरसाठ, राजु सोनवणे, अनिल शिरसाठ, पुजारी संदीप वाघ सह नाभिक समाज बांधव यांनी परीश्रम घेतले.
Post a Comment