ad headr

Powered by Blogger.

शनिवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी




     जळगाव.. { प्रतिनिधी }..
आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन   शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रिकेट मैदानावर विद्या इंग्लिश स्कूलच्या मागे जळगांव* येथे आयोजित करण्यात आली आहे. ज्या मुलांचा जन्म दिनांक ०१.०९.२००३ रोजी वा त्या नंतरचा असेल तेच मुले या निवड चाचणीसाठी पात्र असतील सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग खाली दिलेल्या लिंक https://forms.gle/th8fu9xk4wyfwRWr6 वर जाऊन गुगल फॉर्म व ऑनलाईन निवड चाचणी फी ₹ १००/- भरून आपला सहभाग नोंदवावा व सोबत आपले आधार कार्ड व जन्म दाखला अपलोड करावा तसेच निवड चाचणी साठी क्रिकेट साहित्य पांढरा गणवेश व शूज ओरिजनल जन्म दाखला / आधार कार्ड सोबत आणावे. असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन यांनी केली आहे अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे ( ९४०४९५५२०५ ) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३ ) यांचेशी संपर्क साधावा.
 टीप:  सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी आपला फॉर्म ऑनलाइन भरावे. ज्या खेळाडूंनी ऑनलाइन फॉर्म भरलेला नाही, त्यांना प्रवेश मिळणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.*
 ही निवड जळगांव जिल्ह्याचे खेळाडूं साठी आहे इतर जिल्ह्याचे खेळाडूंना प्रवेश मिळणार नाही.

No comments