ad headr

Powered by Blogger.

अमळनेर येथील मच्छी मार्केटचा झाला उकिरडा.. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मच्छी मार्केटचा आतील आणि बाहेरील परिसर घाणेरडा.

 
अमळनेर { प्रतिनिधी }.. अमळनेर येथील मच्छी मार्केटमध्ये जिल्ह्यातून तसेच बाहेर राज्यातून अनेक मासळी विक्रीस येतात. जिल्ह्यातील आणेर डॅम, तामसवाडी धरण, पाडळसरे धरण तसेच अनेक छोट्या मोठ्या तलावातून गोड पाण्यातील मासे विक्रीस येतात.
त्या मुळे अंमळनेर येथे मच्छी खाणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त प्रमाणात आहे. मागणी असेल तर पुरवठा होतो या सूत्रानुसार अमळनेर मध्ये शेकडो टन मासे विकले जातात. परंतु ज्या मार्केटमध्ये मासे विक्रीत येतात त्या मार्केटची हालत अत्यंत दयनीय झाली असून. आतील आणि बाहेरील परिसरात अत्यंत किडस वाणी, अस्वच्छ असल्यामुळे तिथे दुर्गंधी येते. माशांच्या वेस्टेजसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे ती आस्थाव्यस्त पडलेली असते. त्या घाणीमुळे आणि उकिरड्यामुळे तेथे डास, मच्छर, डुक्कर यांचा थैमान सुरू असतो. नगरपालिका प्रशासन या प्रकाराबद्दल अनभिज्ञ आहे किंवा जाणून बुजून लक्ष देत नाही असे आढळते. 


कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी नेमणूक करून मच्छी मार्केट व भाजीपाला मार्केट यांच्या स्वच्छते बद्दल गंभीर असावे असे अमळनेरकर नागरिकांचे मत आहे. एवढी मोठी प्रशस्त मच्छी मार्केट बनवली परंतु तिचा स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी ऐरणी वर आहे. मुख्याधिकारी यांना जर का प्रशासकाचे काम जमत नसेल तर त्यांनी स्वेच्छेने बदली करून घ्यावी. अशी जाणकारांचे अनेक अमळनेरच्या समस्यांबद्दल कुजबुज आहे. अमळनेर मधील रस्त्यांचा, घरपट्टी वाढीचा, मोकाट जनावरांचा, मोकाट कुत्र्यांचा, भाजीपाला मार्केट मच्छी मार्केटच्या अस्वच्छतेचा, पाणीपुरवठा नियोजनाचा, अशा अनेक तक्रारी नागरिक सहन करत आहेत. व प्रशासकाला अर्थात अमळनेर नगर परिषदेच्या सर्वेसर्वा मुख्य अधिकारी साहेबांना असलेली अनभिज्ञता नागरिकांच्या रोशास कारणीभूत ठरत आहे.

No comments