मोकाट कुत्र्यांच्या अमळनेर शहरातील उपद्रवी मूल्याने जनता हैराण.. न पा प्रशासनाची लक्ष देण्याची आवश्यकता
अमळनेर प्रतिनिधी ... शहरांमध्ये सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. पावसामुळे कुत्र्यांवर अनेक प्रकारचे विषाणूजन्य आजार उद्भवतात. ते मोकाट कुत्रे शहरभर इतरत्र कुठेही झुंडीने भटकतात. शहरात पायी चालणाऱ्या तसेच वाहनधारकांच्या मागे कुत्रे लागतात, परिणामी अनेक अपघात होताना दिसतात. कुत्र्यांच्या झुंडीमध्ये एखादा लहान मुलगा सापडला तर अक्षरशा अनेक वेळा कुत्रे त्यांना चावा घेतात काही वेळा लहान मुलांचे जीव गमावण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चावण्यामुळे अनेक वेळा मानव प्राणी किंवा जनावरे पिसाळतात या घटना नित्याच्या झाल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र अमळनेर तसेच ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे महिन्याकाठी कुत्र्ये चावल्यामुळे किती इंजेक्शन दिले गेले त याची शहानिशा केल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. परंतु नगरपालिका प्रशासनाला याचे काहीही घेणे देणे नाही. योग्य त्या कर्मचाऱ्याला लावून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार पुढे येत आहे. परंतु मुख्याधिकारी साहेबांना याच्यामध्ये काही रस दिसत नाही. त्यांचा धावा दुसरीकडेच असतो असे अनेक वेळा प्रत्ययास येते. अशी कुजबूज नागरिकांमध्ये चालू आहे. रात्री घोडक्याने बसलेले कुत्रे वाहनधारकांच्या पाठीमागे लागल्यामुळे व त्यांच्या चावल्यामुळे अनेक नागरिक त्रस्त असतात. याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी ,अशी मागणी होत आहे.
Post a Comment