ad headr

Powered by Blogger.

हरित जळगावासाठी ८५ वृक्षांची अर्पणवेल...ग्रीन सिटी फाउंडेशन जळगाव चा उपक्रम




जळगाव – “वृक्ष म्हणजे केवळ हिरवे पान नव्हे, तर भविष्याची श्वासरेषा आहे...” – या भावनेने प्रेरित होत ग्रीन सिटी फाउंडेशन जळगाव तर्फे मोहाडी रोडवरील लांडोरखोरी उद्यानासमोर रविवार, 13 जुलै 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता वृक्षलागवडीचा हरित उपक्रम उत्साहात पार पडला.

" आनंद वृक्ष" आणि "स्मृतिवृक्ष"  या दोन अर्थपूर्ण संकल्पनांतून एकूण  85 रोपांची लागवड करण्यात आली . ही रोपटी केवळ जमिनीत नव्हे, तर प्रत्येकाच्या अंत:करणात रुजत गेली.



 या उपक्रमाचे उद्घाटन मा.  श्री. सुरेशदादा जैन व श्री. अशोकभाऊ जैन, व डॉ अमृता सोनोवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी डॉ. ए. जी. भंगाळे, उद्योजक सुबोधकुमार चौधरी,निनाद पाटील विराज कावडीया ,डॉ अमृता सोनोवणे, श्री व सौ प्रकाश चित्ते, कंवरलाल संघवी, जयेश लापसिया, सुहास दुसाने दिलीप चांगरे, बी आर पाटील,  नंदू दादा पाटील, धनंजय खडके, बंटी बूटवानी, राजेंद्र वाणी,शरद पांडे, नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, मुकेश टेकवाणी, आशिष हाडा, रफिक पिंजारी, दिलीप सपकाळे, संतोष क्षीरसागर,हेमंत बापू पाटील हेमंत म्हाळस, रफिक भाई पिंजारी, अमोघ जोशी, हेमंत बेलसरे, राजू पाटील, पृथ्वीराज सोनवणे, आशिष हाडा, अशोक जैन, विनोद चौधरी, शिवराज पाटील, धानवड चे अण्णा पाटील, संगीता घोडगावकर, सिमरन पाटील, डॉक्टर कंचन वाणी, दिलीप सपकाळे, अशोक जाधव, अशोक बागडदे, सुभाष ओसवाल  प्रकाश बेदमुथा, जितेंद्र मुंदडा, सतीश पाटील, देविदास ढेकळे , दिलीप वाणी, वामन माळी, नितीन सपके, मुकेश नाईक, राजू दोशी उमाकांत वाणी, प्रकाश बालाणी, श्री भावसार यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
 जळगावच्या हिरवाईस समर्पित या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक निश्चित पाऊल पडत असल्याचे समाधान श्री सुरेश दादा जैन यांनी व्यक्त केले. व श्री अशोक भाऊ जैन यांनी ग्रीन सिटी फाउंडेशन जळगावच्या या वृक्षारोपणास आपल्या सदैव सहकार्य असेल असे मत व्यक्त केले. व या कार्यक्रमास हरित शुभेच्छा दिल्या 🌳🌳
 कार्यक्रमाच्या शेवटी ग्रीन सिटी फाउंडेशनचे अध्यक्ष वनश्री विजय वाणी यांनी वृक्षलागवडीमागचा उद्देश आणि निसर्गसंवर्धनाचे महत्त्व उलगडून सांगितले. “वृक्षारोपण म्हणजे पृथ्वीला दिलेले आयुष्याचे गोंडस वचन आहे. ही जबाबदारी आपण सर्वांनी मिळून पेलली पाहिजे,” असे ते म्हणाले. त्यांनी उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानत ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला .

No comments