शिवसेना (शिंदे गट) भडगाव तालुका शहर संघटक पदी प्रदीप महाजन यांची फेर निवड .
भडगाव {प्रतिनिधी} सुभाष ठाकरे......
भडगाव येथे नुकताच शिवसेना (शिंदे गट) चा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात अगामी जि.प. व प.स. निवडणूकची रणनीती सह कार्यकर्ते यांनी मनापासुन काम करण्याची सुचना आ. किशोर पाटील यांनी केले. यावेळी काही सक्रिय कार्यकर्ते यांना नियुक्ती देण्यात आली. यावेळी येथील बालविकास प्राथमिक शाळेचे व साईकृपा पतसंस्था संचालक प्रदिप महाजन यांची भडगाव तालुका शहर संघटक म्हणून फेर निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष रावसाहेब गिरिधर पाटील यांच्या स्वाक्षरी नियुक्तीपत्र आ. किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. या नियुक्त्यापत्रात वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिदुतवाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना वाढीवसाठी प्रयत्न करा असे सुचित केले आहे.
या निवडबद्दल प्रदिप महाजन यांचे शिवसेनेचे युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, युवासेनेचे लखिचंद पाटील, बालविकास शाळेचे चेअरमन विजय महाजन, इम्रानअली सैय्यद, नाजिम मिर्झा, प.स. माजी सभापती लक्ष्मीबाई पाटील, शालीग्राम मालकर, भानुदास महाजन, अतुल पाटील, शहर प्रमुख अजय चौधरी, बबलु देवरे, प्रथम नगराध्यक्ष शशिकांत येवले, जग्गु भोई, संतोष महाजन, महिंद्र ततार, नितीन महाजन, सागर महाजन, शिवाजी पाटील, नथ्थु अहिरे, दिनेश पाटील, नाभिक समाज अध्यक्ष संजय पवार (पत्रकार), अॅड भरत ठाकरे, रंगनाथ पाटील, सुभाष ठाकरे, राकेश शिरसाठ, भास्कर महाजन यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment