ad headr

Powered by Blogger.

💥 लाडगाव तासखेडा येथे तहसीलदार साहेबांचे बैठे पथक नाही.. सध्या स्थितीत रेतीची सर्वाधिक उचल तासखेडा लाडगाव बोरी पात्रातून सुरू.. 💥




अमळनेर [ प्रतिनिधी ].. बोरी नदीच्या विस्तीर्ण रेतीचा साठा लाडगाव तासखेडा या गावांच्या ठिकाणी आहे तेथून रात्रभर टेम्पो आणि ट्रॅक्टरने रेतीची उचल सुरू असते. संपूर्ण तालुक्याभर रेती आणि मुरूम उत्खलनाच्या बातम्या आल्यानंतर प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेब ॲक्शन मोडवर आलेले होते. त्यानुसार तहसीलदार साहेबांनी अंमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या नदीकाठावर बैठे पथक नेमून दिलेली होती. तशा पद्धतीने कारवाई सुद्धा होत आहे. परंतु लाडगाव तासखेडा या विस्तीर्ण बोरी नदीच्या काठावर बैठे पथक कार्यरत नसून त्या ठिकाणी रेती माफीयांचा सुळसुळाट आहे. तेथे बैठे पथक का नाही? असा प्रश्न स्थानिक नागरिकांचा आहे. रेती भरून चालणाऱ्या ट्रॅक्टर आणि अवजड वाहनांमुळे नवीन  दुरुस्त झालेला रस्ता त्याचे डांबर उखडून निघत आहे. पुन्हा पुन्हा त्याची डागडुजी होत आहे. लाडगाव नदीपात्राला सैल सोडण्याची कारण काय? तासखेडे आमोदे गावातील रेतीचे भलेमोठे रेतीचे ढीग कोणाचे ?याचे उत्तर कोणाकडे नाही का? की त्याकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष होत आहे का? की कुंपणच शेत खाते आहे?संबंधित गावाचे पोलीस पाटील, महसूल शिपाई, तलाठी, संबंधित सजेचे मंडल अधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदार साहेब हा काय प्रकार आहे. याच्याने जनता संभ्रमित आहे. तेथील रेती उचल त्वरित बंद करावी. अन्यथा नागरिक आंदोलनाचा पवित्रा घेणार, अशी कुजबुज आमच्या प्रतिनिधीकडे आली आहे.

No comments