क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले तथा विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त दोन्ही महामानवांच्या जीवनकार्यावर, भव्य निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धांचे आयोजन....
अमळनेर दि.07[ प्रतिनिधी] शहरांमध्ये अत्यंत नवीन आणि प्रभावी पायंडा सुरू झाला असून महामानवांच्या संयुक्त जयंती निमित्त प्राध्यापक अशोक पवार यांच्या निवासस्थानी निबंध स्पर्धेचे वकृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. जे जे बुद्धिजीवी आणि पुरोगामी विचारधारेच्या विद्यार्थी नागरिकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्याला असलेले ज्ञान व महामानवांचे विचार हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारात व्यक्त व्हावे व आपण या संविधानाची पाईक आहोत हे सिद्ध करण्यासाठी स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, असे आयोजकाकडून आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे नियम नियमावली नाव नोंदणी स्पर्धेची बक्षिसे यांचा संपूर्ण खुलासा खालील प्रमाणे असेल.
. वकृत्व व निबंधासाठी नियम
१) वकृत्व व निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
२) वकृत्व आठ मिनिटात सादर करायचे आहे.
३) निबंध ८०० ते १००० शब्दात असावा.
४) वकृत्व व निबंध यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही.
५) बक्षीसे 1000 रू. ७५०रु. ५००रु. व प्रमाणपत्रे देण्यात येतील
६) वकृत्व स्पर्धा दि.१२/४/२०२६ ला विठ्ठल नगर अमळनेर येथील प्रा. अशोक पवार यांचे निवासस्थान (अभ्यासिकेत ) सकाळी ९ वाजता होईल.
७) निबंध १०/४/२०२६ पर्यंत पाठवावेत.
८) या स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक,कर्मचारी, पालक, कोणीही नागरिक सहभागी घेवू शकतात.
९) विषय निवडताना दोन्ही स्पर्धेसाठी एकच विषय निवडावा.
१) प्रा. अशोक पवार
९४२२२७ ८२५६
२) श्री हृदयनाथ मोरे
९४२१५१२०८५
३) प्रा.राहुल निकम
९८२३२२२६५९
४) श्री बापूराव ठाकरे
९९६०२०९८२५
Post a Comment