भडगाव येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्सवात साजरी.
येथे महावीर जयंती निमित्त भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मंगळवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता जैन स्थानक पासुन काकासट चौक, शनि चौक, बाजारपेठ, खोल गल्ली, मेन रोड,मार्गे लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालय येथे सांगता करण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व दीक्षा बहीण संजना जैन यांची नोव्हेंबर मध्ये भव्य दीक्षा महोत्सव संपन्न होणार असून त्यानिमित्त समाजाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक सचिन चोरडिया यांची नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल व सुरेश भंडारी विविध पदांवर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले.
तसेच लहान मुलांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिष्मा बंब व नेहा कोचर यांनी केले.यावेळी कार्यक्रम यशस्वी साठी समाजाचे संघपती मदनलालजी जैन, अध्यक्ष आनंदकुमार जैन, उपाध्यक्ष प्रकाश चंदजी भंडारी, महामंत्री समीरजी लुनिया,व नवयुवक मंडळ अध्यक्ष प्रीतम भंडारी व सचिव शुभम सुराणा व व सर्व नवयुवक मंडळ यांनी अथक प्रयत्न केले.
Post a Comment