ad headr

Powered by Blogger.

विद्यापीठस्तरीय सूक्ष्मजीवशास्त्र शिक्षक मेळावा, उत्कृष्ट विद्यार्थी गौरव समारंभ व एन.ई.पी. विषयी कार्यशाळा संपन्न.

जळगाव :  [ प्रतिनिधी ] के.सी.ई. सोसायटी संचलित एम. जे. कॉलेज (स्वायत्त), जळगाव येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे मायक्रोबायोलॉजिस्ट्स सोसायटी, इंडिया (एम.बी.एस.आय.) यांच्या सहकार्याने दि.१ मार्च रोजी ‘विद्यापीठस्तरीय सूक्ष्मजीवशास्त्र शिक्षक मेळावा, उत्कृष्ट विद्यार्थी गौरव समारंभ व एन.ई.पी. विषयी व्याख्यान’ हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, 
जळगाव परिक्षेत्रातील सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग या कार्यक्रमास लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बी. एल. चौधरी, संचालक, स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव उपस्थित होते. तसेच प्रा. आर. एच. पाटील, अध्यक्ष, बोर्ड ऑफ स्टडीज (सूक्ष्मजीवशास्त्र) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रताप कॉलेज, अमळनेर येथील परीक्षा नियंत्रक डॉ. शशिकांत जोशी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रासाठी एम.बी.एस.आय.चे समन्वयक प्रा.आर. एम. सगळगिळे तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. जे. चंद्रात्रे हेही व्यासपीठावर उपस्थित होते. 
प्रा. बी. एल. चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील नव्या संधी, संशोधनाची आवश्यकता तसेच बौद्धिक संपदा हक्क पेटंट, उद्योजकता, इनोव्हेशन व इन्कुबेषण यांचे महत्त्व अधोरेखित केले. नवीन शैक्षणिक धोरण (एन.ई.पी.) अंतर्गत सुक्ष्मजीवशास्त्रात अभिनव अध्यापन-पद्धती वापरण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांनी परस्पर संवादातून ज्ञान विनिमय वाढवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी परिक्षेत्रातील प्रत्येकी महाविद्यालयातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके एम.बी.एस.आय. च्या वतीने प्रदान करण्यात आली. 
सूक्ष्मजीवशास्त्र विषयावर आयोजित या विशेष परिसंवाद तसेच ‘नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत अभिनव अध्यापन पद्धती’ या विषयावरील कार्यशाळेला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. के. पी. नारखेडे, विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, एम. जे. कॉलेज, जळगाव यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील प्राध्यापक डॉ. लीना धाके, प्रा. प्रसाद निकुमे, डॉ. नयना पाटील, डॉ. अंजली जाधव, प्रा. श्रेया पांडे व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील शिक्षकांचे जाळे शैक्षणिक व संशोधनाच्या दृष्टीने अधिक बळकट होऊन विद्यार्थ्यांना नवे मार्गदर्शन व संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मायक्रोबायोलॉजिस्ट्स सोसायटी, इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रा. अरविंद देशमुख, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्रा. गणेश साठे, व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.सं.ना.भारंबे यांनी विशेष कौतुक केले.    

No comments