ad headr

Powered by Blogger.

अमळनेर तालुक्यात भीषण अपघात; दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार – एक गंभीर.

अमळनेर-[ प्रतिनिधी ] :- तालुक्यातील ढेकू रोडवरील माऊली पॉलिटेक्निकजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लोटन सुखदेव भामरे हे अमळनेरहून जवखेड्याकडे जात होते. तर शांताराम दशरथ पवार वय 37 (रा. निमझरी, ता. अमळनेर) हे ढेकू येथील लग्न समारंभ आटोपून आपल्या घरी परतत होते. याच दरम्यान दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.या अपघातात शांताराम दशरथ पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर लोटन भामरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
 मयताच्या नातेवाईकांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयात वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसल्याने योग्य उपचार मिळाले नाहीत. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती, तर रुग्णाचे प्राण वाचले असते, असा आरोप त्यांनी केला आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.

No comments